शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

धक्कादायक! गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी मुलाने महिलेवर केले चाकू-हातोड्याने वार

By बाळकृष्ण परब | Published: February 27, 2021 11:12 AM

Crime News : गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमचे पेव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र हे मोबाइलवरील ऑनलाइन गेम मुलांसाठी किती धोकादायक असू शकतात, याचा प्रत्यय एका घटनेमधून आला आहे.

देहराडून - गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमचे पेव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र हे मोबाइलवरील ऑनलाइन गेम मुलांसाठी किती धोकादायक असू शकतात, याचा प्रत्यय देहराडूनमधील एका घटनेमधून आला आहे. (Crime News)येथे ऑनलाइन गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी एका मुलाने रस्त्यावरून जात असलेल्या महिलेच्या डोक्यावर हातोड्याने आणि चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Oniline Game) पोलिसांनी याबाबत प्राथमिक तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासामध्ये ऑनलाइन गेमिंग चॅट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या आधारावर टास्क पूर्ण करण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. (The boy stabbed the woman to complete the task in the game)मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री देहराडूनमधील स्वर्ण गंगा एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या ज्योती नेगी नामक महिलेवर कुण्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी ही महिला कॉलनीमधील रस्त्यावर फिरत होती. तिचा पती जवळच असलेल्या दुकानात दूध घेण्यासाठी गेला होता. नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारीमध्ये महिलेच्या पतीने सांगितले की, अज्ञात व्यक्तीने ज्योतीवर हातोडा आणि चाकूने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून प्रोजेक्ट फाइल, हातोडा आणि भाजी कापायचा चाकू जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेबाबत पीडित महिलेने सांगितले की, हल्लेखोराने तिच्यावर डोक्याचा मागील बाजूस हल्ला केला. त्यानंतर पोलीस माझ्याजवळ आले. तसेच त्यांनी मला एका मुलाचा फोटो दाखवला. दरम्यान, या फोटोमधील मुलानेच माझ्यावर हल्ला केला, असे महिलेने सांगितले. दरम्यान, जा मुलाचा फोटो महिलेला दाखवला गेला तो फरार आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत