Amravati | धक्कादायक! तोंडात दडवलं ब्लेडचे पाते, कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

By प्रदीप भाकरे | Updated: January 4, 2023 22:02 IST2023-01-04T22:01:35+5:302023-01-04T22:02:21+5:30

अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात भोगतोय जन्मठेपेची शिक्षा

Shocking! Blade leaves in mouth and suicide attempt in prison | Amravati | धक्कादायक! तोंडात दडवलं ब्लेडचे पाते, कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

Amravati | धक्कादायक! तोंडात दडवलं ब्लेडचे पाते, कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती: येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदयाने स्वत:च्या डोक्यावर व मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ४ जानेवारी रोजी सकाळी कारागृहातील अतिसुरक्षा विभागाबाहेर ही घटना घडली. या घटनेने तेथे एकच खळबळ उडाली. युवराज उर्फ सुर्या सिल्वम पिल्ले (२७, रा. गोरेगाव इस्ट, मुंबई) असे आरोपी बंद्याचे नाव आहे.

याप्रकरणी मध्यवर्ती कारागृह अधीक्षक भारत भोसले यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी युवराज उर्फ सुर्या सिल्वम पिल्लेविरूध्द गुन्हा दाखल केला. युवराज हा बलात्कार, अनैसर्गिक संभोग,फौजदारी स्वरूपाचा कट या प्रकरणात जन्मठेेपेची शिक्षा भोगत आहे. १८ ऑगस्ट २०१९ रोजी त्याला येथील कारागृहात आणण्यात आले होते. दरम्यान, ४ जानेवारी रोजी सकाळी शिक्षाबंदी अजय बराया (२२, मध्यप्रदेश) हा अतिसुरक्षा विभागात खाली पिपा ठेवण्याकरीता आला. त्यावेळी त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यामुळे तुरूंग अधिकाऱ्यांना माहिती देऊन बराया व युवराज उर्फ सुर्या सिल्वम पिल्ले याला अतिसुरक्षा विभागातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी उपस्थित कारागृह अधिकाऱ्यांनी त्या दोघांना संशयास्पद हालचालीबाबत विचारणा केली असता, शिक्षाबंदीयुवराज उर्फ सुर्या सिल्वम पिल्ले याने तोंडात लपून ठेवलेले ब्लेडचे अर्धे पाते तोंडाबाहेर काढले. तथा स्वत:च्या डोक्यावर व मानेवर जखम करून घेतली. त्यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला. त्याचेवर तेथेच उपचार करण्यात आले.

Web Title: Shocking! Blade leaves in mouth and suicide attempt in prison