धक्कादायक! महेश ट्युटोरिअलमधील शिक्षकांचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 21:06 IST2019-10-18T21:04:34+5:302019-10-18T21:06:25+5:30

महेश ट्युटोरिअल क्लासमध्ये पीडित तरूणी पार्टटाईम कामावर होती.

Shocking! Attempts to rape by teachers in Mahesh tutorials | धक्कादायक! महेश ट्युटोरिअलमधील शिक्षकांचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

धक्कादायक! महेश ट्युटोरिअलमधील शिक्षकांचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

ठळक मुद्देकाॅलेज करून दुपारनंतर ती घरच्यांना मदत मिळावी म्हणून पार्टटाईम क्लासमध्ये नोकरी करायची.आरोपी दोन्ही शिक्षक फरार असल्याची माहिती भोईर यांनी दिली.

पनवेल - खारघर येथील महेश ट्युटोरिअल या खाजगी शिकवणीतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खारघर सेक्टर १२ मधील महेश ट्युटोरिअल क्लासमध्ये पीडित तरूणी पार्टटाईम कामावर होती. काॅलेज करून दुपारनंतर ती घरच्यांना मदत मिळावी म्हणून पार्टटाईम क्लासमध्ये नोकरी करायची.

१० सप्टेंबर रोजी  संध्याकाळी ७.३० वाजता ती क्लासमधून निघाली. मात्र, छत्री विसरल्यामुळे परत क्लासमध्ये आली असता शिक्षक दिनेश जैन याने दरवाजा बंद करून दमदाटी करीत तरूणीवर अत्याचार केला. घडलेली घटना भितीपोटी तरूणीने लगेच घरच्यांना सांगितली नाही. मात्र, काही दिवसांनी दुसरे शिक्षक अनुप शुक्ला याने ही तरूणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने झालेला प्रकार आपल्या भावाला सांगितला. अखेर पीडित तरूणीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर खारघर पोलीस ठाण्यात आरोपी दिनेश जैन आणि अनुप शुक्ला यांच्यावर भा. दं. वि. कलम 376, 342, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर हे प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. आरोपी दोन्ही शिक्षक फरार असल्याची माहिती भोईर यांनी दिली.
 

Web Title: Shocking! Attempts to rape by teachers in Mahesh tutorials