धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 13:16 IST2021-02-14T13:16:00+5:302021-02-14T13:16:27+5:30

Suicide of Police in Navi mumbai : रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

Shocking! Assistant police inspector committed suicide by shooting himself | धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

ठळक मुद्देसहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

नवी मुंबई - एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस ठाण्यात आल्यानंतर ते स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्यानंतर काही वेळाने गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला .दरम्यान पवार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. यामुळे ते सतत शांत रहायचे. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे तणावाच्या करणाबाबत चौकशी देखील केली होती. परंतु त्यांनी स्वतःच्या तणावाबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. मात्र ते आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक कारणाने त्रस्त होते असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Shocking! Assistant police inspector committed suicide by shooting himself