धक्कादायक! पत्नीच्या हत्येनंतर पतीने चिठ्ठी लिहून काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 15:51 IST2020-02-13T15:41:59+5:302020-02-13T15:51:22+5:30
पवईत हत्या प्रकरण: वृद्धेचा पती ठाण्यात सापडला

धक्कादायक! पत्नीच्या हत्येनंतर पतीने चिठ्ठी लिहून काढला पळ
मुंबई - पवईत शीला लाड (६५) या महिलेची हत्या करण्यात आली होती. हत्येमागे पतीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्या पतीला साकिनाका पोलिसांनीठाणे परिसरातून ताब्यात घेतले आहे.
शीला यांच्या हत्येनंतर पती अजित याने चिठ्ठी लिहून घटनास्थळाहून पळ काढला. त्यात स्वत:चेही काही बरेवाईट करून घेईन, असे म्हटल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर ठाणे परिसरात तो जखमी अवस्थेत सापडला. अजितला ठाण्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, डिस्चार्ज मिळाल्यावर पुढील कारवाई करू, अशी माहिती साकिनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी दिली.
पवईच्या तुंगा येथील साकीविहार रोडवरील शिवशक्ती सोसायटीत शीला यांचा मृतदेह आढळला होता. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली होती.