शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

थरकाप उडवणारी घटना! 7 वर्षांच्या मुलानं मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळलं; कारण जाणून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:34 IST

आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेळत असताना झालेल्या वादातून एका ७ वर्षांच्या मुलाने  आपल्या 14 वर्षांच्या मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. जवळपास एक महिना जगण्यासाठी मृत्यूशी झुंजत असताना, उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना राजस्थानातील कोटा येथील उद्योग नगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. उद्योग नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज सिकरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव विशाल असे आहे. तो आपल्या वडिलांसोबत (छोटेलाल) भाजी-पाल्याच्या दुकानावर बसत होता. विशालने फार पूर्वीच शिक्षण सोडले होते. 12 मे रोजी त्याने वडिलांसोबत भाजीपाला खरेदी करून दुकानात आणला. यानंतर त्याचे वडील दुकानावरच थांबले आणि तो घरी गेला. यानंतर काही वेळाने विशाल शेजारी राहणाऱ्या आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत खेळू लागला. याचदरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले.

वडिलांच्या रिक्षातून आणले डिझेल अन्... -पोलिसांचे म्हणणे आहे, की या दोघांमध्ये झालेले भांडण त्यांच्या कुटुंबीयांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यांचे भांडण आणखीनच वाढत गेले. यानंतर आरोपी मुलाने त्याच्या वडिलांच्या रक्षातून डिझेलने भरलेली बाटली आणली आणि ते विशालवर शिंपडून लगेचच आग लावली. या घटनेत विशाल 50 टक्के भाजला होता. यानंतर, त्याला एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आजी-आजोबांकडे राहत होता 7 वर्षांचा मुलगा -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आधी मध्य प्रदेशातील श्योपूर या गावात आजी-आजोबांसोबत राहत होता. त्याचे वडील कोटा येथे रिक्षा चालवतात. महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोटा येथे आणले होते. येथे आल्यानंतर त्याची शेजारी राहणाऱ्या विशालसोबत मैत्री झाली होती.

जेजे अॅक्टमध्ये होणार कारवाई -आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या वडिलांसोबत श्योपूर येथे आहे. पोलीस नियमाप्रमाणे त्याची चौकशी करू शकतात. जुवेनाइल जस्टिस अॅक्टच्या तरतुदीनुसारच मुलावर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसfireआगDieselडिझेल