उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली. कोखराज पोलीस स्टेशन परिसरात, त्याच गावातील एका अल्पवयीन मुलाने ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना १४ तारखेला संध्याकाळी घडली, जेव्हा मुलगी रेल्वे स्टेशनजवळ शेळ्या चरत होती. चॉकलेटचे आमिष दाखवून एका मुलाने मुलीला आपल्यासोबत दुकानात येण्यास सांगितले.
मुलीसोबत जवळच इतरही काही मुले होती. त्यामुळे तो मुलगा दुकानाच्या बहाण्याने तिला जंगलात घेऊन गेला आणि त्याने दृष्कृत्य केले. जेव्हा मुलीला वेदना होऊ लागल्या आणि रक्त येऊ लागले, तेव्हा आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. चिमुरडी मुलगी कशीबशी रडत घरी पोहोचली आणि कुटुंबाला तिच्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली. हे ऐकून कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
कोखराज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच, कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी आरोपी अल्पवयीन असल्याची पुष्टी केली आहे. मुलीचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. या घटनेमुळे परिसरातील स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
एसपी राजेश कुमार म्हणाले की, आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल एका अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मुलीला चॉकलेट टॉफी देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. इतर आवश्यक कारवाई केली जात आहे.