शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून २ कैदी फरार; जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:11 IST

बाथरूमचे गज वाकवून केले पलायन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या येरवडा कारागृहातून दोन कैदी शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हर्षद हानिफ सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) आणि आकाश बाबुलाल पवार (वय २४, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवून ते पळून गेल्याचे उघड झाले आहे. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहेत.येरवडा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून नवीन कैद्यांसाठी प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी तात्पुरती कारागृहे उभारली आहेत.आकाश पवार याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे़ तर, हर्षद सय्यद याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. त्यामुळे त्यांना येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांनी बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवून तेथून पलायन केले. गेल्या आठवड्यात बार्टी येथील तात्पुरत्या कारागृहातून बाळासाहेब कांबळे या कैद्यांने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता़ पोलिसांनी त्याला पकडले होते.

टॅग्स :PuneपुणेjailतुरुंगPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या