shocking...! 2 crore Jewelry was looted from the house of Guru gram hrb | वृद्धेसह मुलाला रस्सीने बांधले; घरातून चक्क गोण्या भरून दागिने लुटले

वृद्धेसह मुलाला रस्सीने बांधले; घरातून चक्क गोण्या भरून दागिने लुटले

गुडगाव : देशाची राजधानी दिल्लीच्या बाजुलाच असलेल्या गुडगावमध्ये दिवसाढवळ्या मोठा दरोडा घालण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. घरात असलेल्या वृद्धाला आणि मुलाला रस्सीने बांधून घरातून तब्बल दोन कोटींचे दागिने पोत्यात भरून नेतानाचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.


शुक्रवारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. गुडगावच्या सेक्टर-45 मध्ये दरोडेखोरांनी वृद्धेसह 6 वर्षांच्या मुलाला रस्सीने बांधले आहे. यानंतर घरातून दोन कोटी रुपयांचे दागिने लुटण्यात आले. ही सारी घटना आसपासच्या सीसीटीव्हींमध्ये कैद झाली असून व्हिडीओमध्ये तीन दरोडेखोर तरुणांना एका मागोमाग एक धावतपळत जाताना पाहिले गेले आहे. दोघांच्या हातामध्ये गोण्या आहेत, तर तिसरा तरुण रिकाम्या हाताने जाताना दिसत आहे.


नवी मुंबईमध्येही दोन वर्षांपूर्वी एका घरातून असाच दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी एका दांम्पत्याने घरातील वृद्धाला शस्त्र दाखवत घरात घुसून तीन कोटी रुपये लुटले होते. पोलिसांनी त्यांना पळून जाण्याच्या बेतात असताना मुंब्रा येथून पकडले होते. 

Web Title: shocking...! 2 crore Jewelry was looted from the house of Guru gram hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.