शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! सीईटीची परीक्षा देवून घरी जात असताना १९ वर्षीय तरुणीचे अपहरण; दिवे घाटातील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 21:59 IST

चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले.

लोणी काळभोर : सीईटीची परीक्षा देवून चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे. हे अपहरण एक दुचाकी व एक चारचाकी मधून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून केले असून यांतील एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.          याप्रकरणी तरूणीच्या २० वर्षीय भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अनिस पठाण व त्याचे दोन मित्र ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीचे गाव पुरंदर तालुक्यात असून तिचे वडील पुणे येथील एका शासकीय कंपनीत कामाला असल्याने ते पत्नी मुलगा व अपह्रत मुलगी यांच्यासमवेत फुरसुंगी ( ता. हवेली ) परिसरातील एका गावात वास्तव्यास आहेत. सुमारे १ वर्षापूर्वी अनिस पठाण याने ह्या तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला होता. याबाबत त्याच्याविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही पठाण हा तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याने सुमारे ४ महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला आपल्यासमवेत मुळ गावी नेले होते. तेथेही १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ - ३० वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी असताना पठाण व त्याच्या मित्रांनी तरुणीच्या कुटुंबातील  सगळ्यांना मारहाण केली होती. त्याबाबतही जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             अपह्रत तरूणीची पुणे येथे सीईटीची परीक्षा असल्याने चुलत भावाने तिला ३० सप्टेंबर रोजी वडिलांकडेे आणूूून सोडले होते. २ ऑक्टोबर रोजी तिने पेपर दिला व त्यानंतर शनिवारी ( ३ ऑक्टोबर ) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बहीण - भाऊ दुचाकीवरून हडपसर - सासवड रोडने चालले होते. त्याचवेळी लाल रंगाची स्विफ्ट कार (एमएच.१२ सीवाय. ७०५६) दुचाकीला आडवी लावली. तसेच दुचाकी(एमएच १२ क्युएस ८१०८) वरून दोन जण आले. त्यामध्ये एक अनिस पठाण हा होता. त्याच्यासोबत आलेल्याने कोयता काढुन उलट्या बाजुने तरुणीच्या भावाला मारला व बहिणीला बळजबरीने ओढु लागला. त्यावेळी प्रतिकार करणाऱ्या भावाला पुन्हा मारहाण केली. अनिस पठाण म्हणाला,  तु मध्ये पडु नको मला या तुझ्या बहिणीसोबतच लग्न करायचे आहे . त्यानंतर बळजबरीने त्याने तरूणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व हडपसर बाजूला निघुन गेला. घडलेला हा प्रकार फिर्यादीने त्याच्या चुलत्यांना सांगितला. तसेच ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जावून तक्रार दाखल केली.             घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे - पाटील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरWomenमहिलाKidnappingअपहरणPoliceपोलिस