धक्कादायक...११ वर्षीय मुलाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 20:43 IST2018-09-01T20:43:21+5:302018-09-01T20:43:43+5:30
याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करत आहेत.

धक्कादायक...११ वर्षीय मुलाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या
मुंबई - भांडुप येथील उत्कर्ष नगरमधील जयभवानी चाळीत राहणाऱ्या संतोष कुळपे यांच्या ११ वर्षीय सक्षम या मुलाने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करत आहेत.
ही खळबळजनक घटना आज दुपारी ३. ३० वाजताच्या सुमारास घडली असून सक्षमला आईने घरी कोणीच नसल्याने तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, याबाबत भांडुप पोलिसांना हॉस्पिटलमधून डॉ. रुचिका पाटील यांनी दुपारी ४. ४० वाजता माहिती दिली. त्यानंतर भांडुप पोलिसांचे पथक रुग्णालयात आणि घटनास्थळी पोचले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.