शाळेचा बॅनर लावणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 19:40 IST2018-12-17T19:38:23+5:302018-12-17T19:40:19+5:30

शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात हा बॅनर आला आणि शॉक लागून प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे

Shock of a school banner, shock and death | शाळेचा बॅनर लावणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू 

शाळेचा बॅनर लावणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू 

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मध्ये गुरुनानक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सकाळी हे तरुण बॅनर लावण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढले होतेया घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे.

उल्हासनगर - शाळेचा बॅनर लावणाऱ्या तरुणाला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मध्ये गुरुनानक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेचं नाव असलेलं जुना बॅनर काढून नवीन बॅनर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंतीवर लावण्यासाठी शाळा प्रशासनाने तीन तरुणांना सांगितलं होतं. यासाठी या तरुणांना शाळा प्रशासन २०० रूपये देणार होती.

सकाळी हे तरुण बॅनर लावण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढले होते. शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात हा बॅनर आला आणि शॉक लागून प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे.

Web Title: Shock of a school banner, shock and death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.