Video : शिवसेना नगरसेवकाची दादागिरी, कोंबडी विक्रेत्याला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 21:45 IST2019-07-05T21:43:51+5:302019-07-05T21:45:47+5:30

महापालिकेने लक्ष दिल्याने अखेर वैद्य यांनी कायदा हाती घेतला आणि कोंबडी विक्रेत्याला मारहाण केली. 

Shiv Sena corporator milind vaidya assaulted poultry seller | Video : शिवसेना नगरसेवकाची दादागिरी, कोंबडी विक्रेत्याला केली मारहाण

Video : शिवसेना नगरसेवकाची दादागिरी, कोंबडी विक्रेत्याला केली मारहाण

ठळक मुद्देनुकतेच वडाळ्याच्या भाजपा नगरसेवक कृष्णावेन्नी रेड्डी यांनी सफाईकामगाराच्या श्रीमुखात मारली होती. माजी महापौर असलेल्या मिलिंद वैद्य यांच्या तक्रारीलाही महापालिका दाद देत नाही. म्हणून माजी महापौराने कायदा हातात घेतला आहे. 

 

मुंबई - मुंबईचे  माजी महापौर आणि शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी दादागिरी करत कोंबडी विक्रेत्याच्या सामानाची तोडफोड करून त्याला मारहाण केली आहे. माहिम मच्छीमार कॉलनी आणि माहीम पोलीस वसाहतनजीक  काही कोंबडी विक्रेते उघड्यावर गाड्या लावून कोंबड्या विकतात. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते अशी तक्रार मच्छिमार कॉलनी आणि पोलीस कॉलनीतल्या रहिवाशांनी केली होती. हा मुद्दा वारंवार महापालिकेच्या प्रभाग समितीत उपस्थित करूनही महापालिकेने लक्ष दिल्याने अखेर वैद्य यांनी कायदा हाती घेतला आणि कोंबडी विक्रेत्याला मारहाण केली. 

नुकतेच वडाळ्याच्या भाजपा नगरसेवक कृष्णावेन्नी रेड्डी यांनी सफाईकामगाराच्या श्रीमुखात मारली होती. रेड्डी यांच्यावर अँटॉप हील पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. विशेषतः  महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील माजी महापौर असलेल्या मिलिंद वैद्य यांच्या तक्रारीलाही महापालिका दाद देत नाही. म्हणून माजी महापौराने कायदा हातात घेतला आहे. 

Web Title: Shiv Sena corporator milind vaidya assaulted poultry seller