ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 00:09 IST2025-08-20T00:08:30+5:302025-08-20T00:09:14+5:30
अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला हॉस्पिटलला नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
शिमला - हिमाचल प्रदेशात एका दुर्दैवी प्रेम कहाणीचा भीषण शेवट झाला आहे. कधी काळी ज्या व्यक्तीनं अंजलीचं हृदय जिंकलं होते, त्यानेच तिचा श्वास रोखला आहे. अंजली हत्याकांडात ५ दिवसांनी पोलिसांनी खुलासा करत आरोपी पतीला अटक केली आहे. हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे ही घटना घडली. अंजली रामपूरच्या तकलेच गावातील रहिवासी होती. तिचा सुशीलसोबत प्रेमविवाह झाला होता.
१४ ऑगस्टला एका खोलीत अंजली नावाची मुलगी मृतावस्थेत आढळली. घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. अंजलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी आयजीएससी हॉस्पिटलला पाठवला. १६ ऑगस्टला पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये अंजलीला मारहाण झाल्याचं समोर आले. अंजली आणि सुशील दोघांनी प्रेम विवाह केला होता. २०२१ मध्ये या दोघांचे लग्न झाले. अंजली पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होती. पती सुशीलसोबत झालेल्या वादानंतर ती पतीपासून वेगळी राहत होती. १४ ऑगस्टला अंजलीला भेटण्यासाठी तिचे सासरे आणि पती आले होते. त्यांनी दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिता पुत्र तिथून निघून गेले. मात्र पती सुशील पुन्हा अंजलीच्या घरी आला आणि तिला बेदम मारहाण केली.
मारहाणीत अंजलीचा मृत्यू झाला या प्रकरणी २५ वर्षीय आरोपी पतीला १८ ऑगस्टला पोलिसांनी अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. अंजलीच्या घरच्यांनी मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. अंजली शिक्षणात खूप हुशार होती. तिला दहावीत ९० टक्के मिळाले होते, ती मेरिटमध्ये आली होती. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर तिला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली होती. पती सुशीलने तिला बेदम मारहाण करून शिमलाला पळाला. अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला हॉस्पिटलला नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून आरोपी सुशीलला ताब्यात घेतले.
कसा लागला आरोपीचा शोध?
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी आरोपी सुशील पत्नी अंजलीच्या खोलीत जाताना दिसला. त्यानंतर रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी तो बाहेर पडला. अंजलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुशीलला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्येही अंजलीचा मृत्यू मारहाणीने झाल्याचे उघड झाले.