Big News: शिल्पा शेट्टी-राज कुंद्रानं शर्लिन चोप्रावर ठोकला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:23 IST2021-10-19T17:22:04+5:302021-10-19T17:23:30+5:30
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

Big News: शिल्पा शेट्टी-राज कुंद्रानं शर्लिन चोप्रावर ठोकला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यावर प्रत्युत्तर देत आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी शर्लिन चोप्रा हिला थेट कोर्टात खेचलं आहे.
शर्लिन चोप्रानं केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहिन असल्याचं राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. शर्लिन केलेल्या आरोपांविरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा आम्ही कोर्टात केला आहे, असंही वकिलांनी सांगितलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्रा हिला नोटिस धाडली असून त्यात तिनं केलेले आरोप खोटे, निराधार आणि तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. समाजात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना बदनाम करण्यासाठी शर्लिन चोप्रानं असे खोटे आरोप केल्याचंही नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही शर्लिन चोप्रा विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला असल्याचंही वकिलांनी सांगितलं.
१४ ऑक्टोबर रोजी शर्लिन चोप्रा हिनं मुंबईतील जुहू येथील पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात खळबळजनक आरोप करत तक्रारीची नोंद केली होती. यात शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रावर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसंच फसवणुकीचीही तक्रार केली आहे.