शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:49 IST

Sheetal Chaudhary News: हरयाणातील मॉडेल शीतल चौधरीचा एका कालव्यात मृतदेह आढळून आला. तिचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या बॉयफ्रेंडने केला, पण तपासातून वेगळीच माहिती समोर आली. 

Sheetal Chaudhary Haryana: हरयाणातील मॉडेल शीतल चौधरीचा अपघाती मृत्यू झाला नसून तिची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासातून उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी शीतलचा बॉयफ्रेंड सुनीला अटक केली आहे. हरयाणातील सोनीपत जिल्ह्यात असलेल्या खरखौदा परिसरात एका कालव्यात शीतलचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सुनीलची चौकशी केली. त्याने आमचा अपघात झाल्याचे आणि शीतलचा मृत्यू झाल्याचे सांगितले, पण नंतर सगळं बिंग फुटले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मॉडेल शीतल चौधरी म्युझिक अल्बममध्ये काम करायची आणि पानीपतमध्ये तिच्या बहिणीसोबत राहत होती. ती १४ जून रोजी शुटिंगसाठी घरातून बाहेर पडली होती, पण परत आलीच नाही. 

वाचा >>कोल्हापुरात गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू, पोलिस तपास सुरु

तिच्या नातेवाईकांनी पानीपत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सोनीपत पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पोलिसांना रविवारी रात्री उशिरा माहिती मिळाली की, एका तरुणीचा मृतदेह कालव्यामध्ये मिळाला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यात आली, तो मृतदेह शीतलचा असल्याचे स्पष्ट झाले. शीतल बेपत्ता असल्याची तक्रार पानीपत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.'

सुनीलने केला अपघाताचा बनाव

सुनील हा शीतलचा बॉयफ्रेंड आहे. सुनीलने शीतलचा मृत्यू अपघातात झाला, असा बनाव रचला होता. पण, नंतर त्याचे बिंग फुटले. 

शीतलच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, शनिवारी रात्री दीड वाजता शीतलने मला व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल केला होता. तिने सांगितले की, सुनील मारहाण करत आहे. त्यानंतर शीतलचा मोबाईल स्वीच ऑफ येऊ लागला. 

कालव्याजवळ सापडली सुनीलची कार

रविवारी सकाळी पानीपत जवळ असलेल्या एका कालव्याजवळ सुनीलची कार मिळाली. पण, शीतलबद्दल काहीही कळू शकले नाही. त्यानंतर सोमवारी शीतलचा मृतदेह सोनीपतजवळील खरखौदामध्ये कालव्यात मिळाला. कार मिळालेल्या ठिकाणापासून ८० किमी दूर शीतलचा मृतदेह वाहून गेला होता. छाती आणि हातावरील टॅटूवरून शीतलची ओळख पटली. 

सुनील रुग्णालयात झाला दाखल

शीतलची हत्या केल्यानंतर सुनीलने अपघात झाल्याचे दाखवण्याचा बनाव केला. तो पानीपतमधील एका रुग्णालयात दाखल झाला. पोलिसांना तो तिथे असल्याचे कळले. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, गाडी कालव्यात कोसळली होती. पण, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शीतलची हत्या केल्याचे कबूल केले. 

सुनील विवाहित आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत. त्यामुळेच शीतलने त्याच्यासोबतचे नाते तोडले होते. पण, तरीही तो शीतलचा पिच्छा सोडत नव्हता. त्यातूनच त्याने शीतलला संपवले. शीतलच्या मृतदेहावर खूणा आढळून आल्या आहेत. सुनीलने चाकूने शीतलवर वार केले. शीतल ६ वर्षांपासून सुनीलला ओळखत होती. पूर्वी ती कर्नालमध्ये सुनीलच्याच हॉटेलवर नोकरी करायची. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसHaryanaहरयाणा