लपाछपीने घेतला दोन मुलींचा जीव, ‘आम्ही कुणाला सापडणारच नाही’, म्हणत त्या आईसक्रीमच्या बॉक्समध्ये लपल्या, पण…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:24 IST2022-04-28T15:23:46+5:302022-04-28T15:24:22+5:30
Karnataka News: लपाछपीचा खेळ दोन निरागस मुलींच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली लपाछपी खेळत असताना ही दुर्घटना घडली. समोर आलेल्या वृत्तानुसार म्हैसूरमधील नंजनगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

लपाछपीने घेतला दोन मुलींचा जीव, ‘आम्ही कुणाला सापडणारच नाही’, म्हणत त्या आईसक्रीमच्या बॉक्समध्ये लपल्या, पण…
बंगळुरू - लपाछपीचा खेळ दोन निरागस मुलींच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली लपाछपी खेळत असताना ही दुर्घटना घडली. समोर आलेल्या वृत्तानुसार म्हैसूरमधील नंजनगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ज्या मुलींचा मृत्यू झाला त्यांची नावं काव्या नायक आणि भाग्या नायक अशी असल्याचे समोर आले आहे. यामधील काव्या नायक ही ५ वर्षांची होती. तर भाग्या नायक ही ११ वर्षांची होती. ही दुर्घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुली घराजवळ शेजारच्या मुलांसोबत लपाछपी खेळत होत्या. तिथेज भाग्याच्या घराशेजारी एक आईसक्रीमचा गाडाही उभी होती. गेल्या सहा महिन्यांपासून तो तिथेच बंद अवस्थेत होता. तसेच त्याचा मालक नोकरीच्या शोधात अन्यत्र गेला होता.
खेळत असताना दोन्ही मुली या आईसक्रीमच्या गाड्यातील आईसक्रीमच्या बॉक्समध्ये लपल्या. त्यांना वाटले की, यामध्ये लपल्यावर कुणी शोधूच शकणार नाही. इतर मुलांनीही त्यांना या बॉक्समध्ये लपताना पाहिले नाही. अखेरीस हाच बॉक्स त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला.
पोलिसांनी सागितले की, आईसक्रीम बॉक्समध्ये कदाचित विषारी हवा असावी, तसेच दीर्घकाळापासून हा बॉक्स वापरात नव्हता. तसेच त्याचे झाकणही हवेच्या दबावामुळे बंद झाले. त्यामुळे त्या मुली बाहेर पडू शकल्या नाहीत. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.