शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! औषध लावण्याच्या बहाण्याने रुग्णाच्या गुप्तांगाला वॉर्डबॉयने केला स्पर्श 

By पूनम अपराज | Updated: December 23, 2020 20:06 IST

Molestation : दिंडोशी पोलिसांनी २४ वर्षीय मुकेश प्रजापती नावाच्या वॉर्डबॉयला अटक केली आहे.

ठळक मुद्देपीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रजापती याच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी प्रजापतीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरात मालाड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात औषध लावण्याच्या बहाण्याने वार्डबॉयने २९ वर्षीय मुलीच्या शरीराच्या गुप्तांगास हात लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिसांनी २४ वर्षीय मुकेश प्रजापती नावाच्या वॉर्डबॉयला अटक केली आहे.मालाड परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय मुलीला मागील अनेक दिवसांपासून मुळव्याधीचा त्रास होत होता. या मूळव्याधीवर उपचार करण्यासाठी ती रुग्णालयात दाखल झाली होती. मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन होणार होते. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी आरोपी वार्डबॉय प्रजापती हा पीडितेच्या रूममध्ये गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. 

ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी औषध लावण्याचे सांगितले आहे, असं आरोपी प्रजापती याने पीडित तरुणीला सांगितले. या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या गुप्तांगाला स्पर्श केला. घडलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणीने हॉस्पिटलमध्ये आरोपी विरोधात आरडाओरडा केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रजापती याच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी प्रजापतीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकhospitalहॉस्पिटल