लज्जास्पद! औषध लावण्याच्या बहाण्याने रुग्णाच्या गुप्तांगाला वॉर्डबॉयने केला स्पर्श 

By पूनम अपराज | Updated: December 23, 2020 20:06 IST2020-12-23T20:06:22+5:302020-12-23T20:06:49+5:30

Molestation : दिंडोशी पोलिसांनी २४ वर्षीय मुकेश प्रजापती नावाच्या वॉर्डबॉयला अटक केली आहे.

Shame! The warden touched the patient's genitals under the pretext of administering the drug | लज्जास्पद! औषध लावण्याच्या बहाण्याने रुग्णाच्या गुप्तांगाला वॉर्डबॉयने केला स्पर्श 

लज्जास्पद! औषध लावण्याच्या बहाण्याने रुग्णाच्या गुप्तांगाला वॉर्डबॉयने केला स्पर्श 

ठळक मुद्देपीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रजापती याच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी प्रजापतीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरात मालाड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात औषध लावण्याच्या बहाण्याने वार्डबॉयने २९ वर्षीय मुलीच्या शरीराच्या गुप्तांगास हात लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिसांनी २४ वर्षीय मुकेश प्रजापती नावाच्या वॉर्डबॉयला अटक केली आहे.

मालाड परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय मुलीला मागील अनेक दिवसांपासून मुळव्याधीचा त्रास होत होता. या मूळव्याधीवर उपचार करण्यासाठी ती रुग्णालयात दाखल झाली होती. मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन होणार होते. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी आरोपी वार्डबॉय प्रजापती हा पीडितेच्या रूममध्ये गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. 

ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी औषध लावण्याचे सांगितले आहे, असं आरोपी प्रजापती याने पीडित तरुणीला सांगितले. या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या गुप्तांगाला स्पर्श केला. घडलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणीने हॉस्पिटलमध्ये आरोपी विरोधात आरडाओरडा केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रजापती याच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी प्रजापतीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Shame! The warden touched the patient's genitals under the pretext of administering the drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.