लज्जास्पद! सहा महिने सात नराधम करत होते अल्पवयीन मुलीवर गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:50 IST2021-03-12T20:48:38+5:302021-03-12T20:50:53+5:30
Minor girl gang-raped by seven in Haryana's Bhiwani for six months : आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६- डीए, ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लज्जास्पद! सहा महिने सात नराधम करत होते अल्पवयीन मुलीवर गँगरेप
हरियाणाच्या भिवानी पोलिसांनी शहरातील १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६- डीए, ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय झालं ?
ही मुलगी आजारी पडल्यानंतर घटना उघडकीस आली. तिला रूग्णालयात नेण्यात आले जेथे वैद्यकीय तपासणीत ती गेल्या दोन महिन्यांपासून गर्भवती असल्याचे समोर आले आहे. नंतर पीडित मुलीने तिच्या पालकांना सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सात लोक तिच्यावर वारंवार बलात्कार करत आहेत. पीडित मुलगी गप्प राहिली आणि कुटुंबीयांसमोर सत्य समोर आणले नाही, कारण आरोपीने तिला असे केले तर तिला पेटवून देण्याची धमकी दिली होती.
फिर्यादीनुसार आरोपी पीडितेचे शेजारी असून किराणा दुकान मालक सत्यनारायण, त्याचा मुलगा रवींदर आणि अन्य पाच जण आहेत. दोन आरोपींचे वय ५२ ते ५३ आणि इतरांचे वय ३० ते ३५ या दरम्यान आहे. "पीडित महिला सत्यनारायण यांच्या दुकानातून किराणा सामान विकत घ्यायची. दुकानात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला लवकरच अटक केली जाईल," असे एसएचओ बवानी खेडा, रवींद्र कुमार यांनी सांगितले.