ठळक मुद्देसँडल वुड ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. सप्टेंबर 2020 पासून खूप काळासाठी आदित्य अल्वा फरार होता.
कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा याला अटक करण्यात आली आहे. सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ही कारवाई केली आहे. सप्टेंबर 2020 पासून खूप काळासाठी आदित्य अल्वा फरार होता.
मंगळवारी आदित्य अल्वाचे मेडिकल चेकअप करण्यात आली. त्यानंतर कोर्टात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी चौकशीदरम्यान आदित्य अल्वाने निर्दोष असल्याचा दावा केला. मी फक्त पार्टी आयोजित केली होती. मात्र, मी ड्रग्ज घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही, असे आदित्यने चौकशीदरम्यान सांगितले होते. आदित्यच्या आतापर्यंतच्या चौकशीत ड्रग्ससंबंधित कोणतीही माहिती समोर आलेली नाही.आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अलवा यांचा मुलगा आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील गायक आणि कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सँडल वुड ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला होता. आदित्य विवेकच्या घरात लपून असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती. त्यानंतर सीसीबीने विवेक ओबेरॉयच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या घराचीही झाडाझडती घेतली होती.
Web Title: shake in Bollywood! Vivek Oberoi's brother-in-law Aditya Alva arrested
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.