शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक व खंडणी उकळल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगतापसह चौघांना १४ दिवस पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 18:59 IST

सर्वात मोठी पोलीस कोठडी : ७२ तासात हजर होण्याचे आदेश

ठळक मुद्देएकाच वेळी १४ दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

पुणे : फसवणुक व खंडणी उकळण्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह चौघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला आहे.या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यावर पोलीस आणि सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात अपील केले होते. बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, जयेश जगताप, परवेझ जमादार आणि पत्रकार देवेंद्र जगताप यांना कोठडी सुनावण्यात आली. शैलेश जगताप सध्या न्यायालयीन कोठडीत असून अन्य ३ आरोपींना ७२ तासात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. एका गिरणी व्यावसायिकास शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका जमिनीचा आपण व्यवहार करीत असल्याचे आरोपी प्रकाश फाले याने सांगितले होते. त्यामध्ये पैसे गुंतविल्यास दुप्पट नफा होईल असे आमिष दाखवून त्याच्याकडून १७ लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. या गुन्ह्यात जगताप, रवींद्र बऱ्हाटेसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यात फाले याला २८ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करुन इतर चार जणांना जामीन देण्यात आला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सरकार पक्षाने सत्र न्यायालयात अपील केले होते. त्यानुसार न्यायालयाने बुधवारी आरोपींना हजर करण्याचा आदेश दिला होता. या अपिलावर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेश कावेडिया यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, फिर्यादी यांची फसवणूक केलेल्या १७ लाखांपैकी किती रक्कम या ४ आरोपींना मिळाली. त्यांनी खोटी कागदपत्रे कोठे बनवली़ गुन्ह्यांचा कट कुठे रचला. त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. ते ग्राह्य धरुन सत्र न्यायालयाने कॅन्टोन्मेंट न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला. या आदेशापासून ७२ तासात न्यायालयात हजर राहावे व त्यापासून पुढे १४ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. एकाच वेळी १४ दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी