शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

लोन ॲपच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्यांना बेड्या

By सागर दुबे | Updated: May 13, 2023 23:14 IST

सायबर पोलिसांची कारवाई; २ लाखांची रक्कम तक्रारदाराला केली परत

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: ३५ बोगस चिनी लोन ॲप इन्स्टॉल करायला सांगून पैशांची मागणी केलेली नसताना सुध्दा लोन स्वरूपात ६ लाखाची रक्कम पहुर येथील डॉ.जितेंद्र वानखेडे यांच्या बॅंक खात्यात पाठविली. त्यानंतर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी देवून डॉक्टराकडून ४ लाख २३ हजार ७१९ रूपये उकळणा-या सायबर ठगांच्या गँगच्या सायबर पोलिसांनी बंगलुरू (कर्नाटक) येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून २ लाख रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली असून ती रक्कम डॉक्टराला परत करण्यात आली आहे.

डॉ. जितेंद्र वानखेडे यांना ९ जुलै २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सायबर ठगांनी संपर्क साधून ३५ चिनी लोन ॲप इस्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वानखेडे यांच्या मोबाईलमधील संपूर्ण डाटा चोरून घेतला. त्यानंतर पैशांची मागणी केलेली नसताना सुध्दा ठगांनी वानखेडे यांच्या बँग खात्यामध्ये लोन स्वरूपात ६ लाख ८ हजार रूपये पाठविले. नंतर त्यांना ठगांनी लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जीवे ठार मारण्याची धमकी देवून अधिक पैशांची मागणी केली. पैसे पाठविले नाही म्हणून ठगांनी बदनामीकारक संदेश वानखेडे यांच्या नातेवाईक व परिचयांना पाठविण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांनी उसनवारीने पैसे घेवून ठगांना ४ लाख २३ हजार रूपये पाठविले. मात्र, ठगांकडून पुन्हा पैशांची मागणी होत असल्यामुळे वानखेडे यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.---संशयित निष्पन्न होताच गाठले बंगलुरूगुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्यासह कर्मचा-यांनी डॉक्टराने दिलेले कागदपत्र व लोन ॲपची माहिती व ज्या बँक खात्यामध्ये रक्कम भरली, अशी सर्वांची माहिती घेवून तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित सायबर ठग हे बंगलुरू येथील असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दिप्ती अनफाट, दीपक सोनवणे, गौरव पाटील, अरविंद वानखेडे यांचे पथकाने बंगलुरू गाठून प्रवीण गोविंदराज (२८), सतिष पी (३०, दोन्ही रा. बंगलुरू) यांना अटक केली.----२ लाखाची रक्कम सुपूर्ददोघांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी २ लाख रूपयांची रक्कम काढून दिली. ही रक्कम शुक्रवारी पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्याहस्ते फिर्यादी डॉ. जितेंद्र वानखेडे यांना परत देण्यात आली. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांनी केले होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी