शाब्बास मुंबई पोलीस... फक्त २४ तासांत शोधली परदेशी नागरिकाची बॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 05:31 PM2018-07-19T17:31:46+5:302018-07-19T17:32:26+5:30

अतिथी देवो भव समजून केला कुलाबा पोलिसांनी तपास

Shabas Mumbai Police ... Finds Outbound Citizen's Bag in 24 Hours | शाब्बास मुंबई पोलीस... फक्त २४ तासांत शोधली परदेशी नागरिकाची बॅग

शाब्बास मुंबई पोलीस... फक्त २४ तासांत शोधली परदेशी नागरिकाची बॅग

Next

मुंबई - परदेशी सुदान नागरिक यांचे टॉक्सित राहिलेली मौल्यवान वस्तू आणि परकीय चलन असलेली बॅग कुलाबा पोलिसांनी फक्त 24 तासांच्या आत कौशल्याने तपास करून शोधून काढली.  मोहमद अब्दुल युसूफ आलं हसन (वय - 22)  व अब्दुल राहिम बसिर याकूब (वय 39 ) हे  दोघे सुदान नागरिक हे बेहरीनाहून मुंबईत व्यवसायाकरिता आले होते. प्रवासादरम्यान त्यांची बॅग टॅक्सीत राहिली होती. याबाबत त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अतिथी देवो भव समजून आम्ही तपास केला असे कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी सांगितले.

१७ जुलैला हसन आणि याकूब यांनी सहार येथून टॅक्सी पकडली व टॉक्सिने कुलाबा सी व्ह्यू हॉटेल येथे उतरले. टॉक्सितून उतरताना त्यांनी त्यांची पैसे आणि पासपोर्ट असलेली बॅग  घेण्यास विसरले. त्यानंतर मुंबईत व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या सुदान नागरिकांच्या मागे ग्रहणच लागले. काळजीत असलेल्या या दोघांनी कुलाबा पोलीस ठाणे गाठले आणि बॅग हरविल्याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपवकर यांना देण्यात आली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपवकर आणि  पोलीस निरीक्षक शेंडग यांनी टॉक्सिच शोध घेण्याचे आदेश दिले.  त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भोई व काकडे यांनी कुलाबा पोलीस ठाणे हद्दीतील 20 ते 25 सीसीटीव्ही तपासले. मात्र, टॅक्सीचा नंबर काही मिळाला नाही. नंतर वांद्रे सी लिंक येथे पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी जाऊन सीसीटीव्ही तपासले असता  MH 02 BQ 9572 हा नंबर असलेली टॅक्सी सायंकाळी ५ वाजता सापडली. अंधेरी आरटीओने या टॅक्सी नंबरबाबत माहिती पोलिसांना दिली. धोपवकर यांनी त्यांचे वैयक्तिकी ओळखीचा वापरुन टॅक्सीची अधिक माहिती मिळविली. या माहितीनुसार टॅक्सीचालक हा मालाड येथे राहत असून त्याचे नागपाडा येथील मार्कंन्टाईल कॉ ऑपरेटिव्ह बँक येथे बँक हप्ते भरीत असल्याची माहिती मिळाली.या बँकेमध्ये पोलीस उपनिरीक्षक भोई व पोलीस शिपाई भालेराव यांनी जाऊन त्याचा मोबाईल क्रमांक मिळविला व त्यावर वारंवार सपर्क केले असता तो कोणताही रिप्लाय देत नव्हता म्हणून त्याच्या राहत्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला. मात्र, तास्कि चालकाने त्याचे घर सात वर्षापूर्वी विकून गेला असल्याची माहिती मिळाली म्हणून मालाड परिसरात राहणारे रहिवासी सुरेश पृथ्वी राज यादव व लक्ष्मी शंकर यादव याना घटनेचे गांभीर्य सांगून विश्वासात घेऊन माहिती विचारले असता त्यांनी तो सांताक्रूझ परिसरामध्ये त्याच्या टॅक्सीमध्ये राहतो असे सांगितले. सहार विमानतळ परिसरात शोध घेतला असता देखील तो सापडला नाही. शेवटी  टॅक्सी स्टॅण्डचे रेकॉर्ड तपासले आसता तो रात्री दोन वाजता टॅक्सी स्टॅण्डला त्याची टॅक्सी आत आल्याची माहिती मिळाली.  म्हणून अंदाजे 700 टॅक्सी तपासण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याचे टॅक्सी चालकाला कळाले आणि घाबरून त्याने सहार पोलीस ठाणे येथे पर्स जमा करण्यासाठी गेला असताना त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर कुलाबा पोलिसांनी संपर्क केला असता त्याने कॉल रिसिव्ह करून सहार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले. त्यावेळी सहार पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिसाला त्याला पोलीस ठाण्यात थांबविण्यास सांगून कुलाबा पोलिसांनी त्याचा ताबा घेत त्याच्याकडून बॅग हस्तगत केली. या बॅगेत सुदान नागरिकत्वचे दोन पासपोर्ट,  दुबई चलन दिनार 10000/- (भारतीय किंमत 187000/-),  युरो चलन 2500/-(भारतीय किंमत 200000/-), अमेरिकन डॉलर 700/-(भारतीय किंमत 48000/-),  अंगावर परिधान करण्याचे दोन जॅकेट या वस्तू सापडल्या. हरवलेली बॅग परत सापडल्याने सुदान नागरिक आनंदी होऊन पुन्हा आपल्या मायदेशी परतले. 

Web Title: Shabas Mumbai Police ... Finds Outbound Citizen's Bag in 24 Hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.