शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

स्लमडॉग मिलियनेयरमधील अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा 

By पूनम अपराज | Updated: February 24, 2021 17:08 IST

Sexual harassment : ही घटना १३ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली. शाका लका बूम बूमच्या  अभिनेत्याने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ठळक मुद्दे तक्रारदार महिला वांद्रे येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मधुर मित्तल याची तिच्यासोबत भेट झाली. नंतर मधुर मित्तल याने पंधरवड्यातच दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती केली असल्याचे तक्रारदार महिलेचे वकील निरंजनी शेट्टी यांनी उघड केले.

स्लमडॉग मिलियनेयर या सिनेमात ज्याने समीर मलिकची भूमिका साकारली त्या अभिनेत्याविरोधात खार पोलिसांनी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मधुर मित्तल हे या अभिनेताचं नाव आहे, फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने तिच्या घरी एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केली होती. आता पोलिस चौकशी सुरू आहे.  पोलिसांनी याबाबत सांगितले की, ही घटना १३ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली. शाका लका बूम बूमच्या  अभिनेत्याने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.तक्रारदार महिला वांद्रे येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मधुर मित्तल याची तिच्यासोबत भेट झाली. नंतर मधुर मित्तल याने पंधरवड्यातच दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती केली असल्याचे तक्रारदार महिलेचे वकील निरंजनी शेट्टी यांनी उघड केले. शिवाय, फिर्यादीच्या वकिलाने असे सांगितले की, तिने ११ फेब्रुवारीला त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते आणि दोन दिवसानंतर, तिच्यावर त्याने हल्ला केला."मधुर मित्तल संतापलेला होता. तो माझ्या क्लायंटच्या खोलीत आला आणि तिला बोलण्याची संधी न देता १५ पेक्षा जास्त वेळा तिच्या कानाखाली लगावली, तिला अनेकदा मारहाण केली, केस खेचले, शारीरिक अत्याचार केला आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा लैंगिक अत्याचार त्याने केला होता. तिच्या चेहऱ्यावर, मान, छाती, हात, पाठ आणि कान, डोळे यांना जखमा झाल्या आहेत," असे पुढे वकील म्हणाले.

 

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा 

 

१५ फेब्रुवारी रोजी मित्तल हा पीडित महिलेच्या निवासस्थानाखाली आढळून आला होता, परंतु शेट्टी यांनी त्यांना बोलावून समज दिली. फ्री प्रेस जर्नलच्या बातमीत असे म्हटले आहे की, त्याच्यावर विनयभंग, लैंगिक छळ आणि अत्याचार यासाठी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने मधुर मित्तलविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. मधुर मित्तल सध्या जयपूरमध्ये एका डिजिटल सिरीजच्या शूटिंगमध्ये आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसadvocateवकिलMumbaiमुंबई