तरुणीचे अपहरण करुन शेतात नेलं, अत्याचार केला; मित्र बाहेर उभा, त्याच्याशी बोलला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 11:34 IST2022-12-03T11:31:16+5:302022-12-03T11:34:51+5:30
घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

तरुणीचे अपहरण करुन शेतात नेलं, अत्याचार केला; मित्र बाहेर उभा, त्याच्याशी बोलला अन्...
नवी दिल्ली- जीएनएम कोर्स (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी) करणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून उसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तराखंडमध्ये घडला आहे.
घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. ती मुरादाबाद येथून जीएनएम कोर्स करत असल्याचे विद्यार्थिनीने तहरीरमधील कुंदा पोलीस ठाण्यात सांगितले. ती रुग्णालयात अभ्यासानूसार सरावही करते.
सदर तरुणी रुग्णालयातून सराव करुन घरी परतत होती. अंधार असल्यामुळे तिने तिच्या मित्राला फोन करून घरी सोडण्यास सांगितले. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, ती एका मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात होती. दोन तरुणांनी त्यांना बागवाड्याजवळ जबरदस्तीने अडवले. त्यानंतर तरुणीच्या मित्राला धमकावून तिला पळवून घेऊन गेले.
सदर तरुणीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं पोलिसांना सांगितले. तसेच त्याचा साथीदार शेताबाहेर पहारा देत होता. काही वेळेनंतर दोघांनी दारू प्यायली आणि आरोपी गुरविंदर गुरीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. सकाळी पुन्हा तोच प्रकार घडला. पीडितेने आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक लिहून ठेवला होता.
सदर प्रकरणामुळे मी खूप घाबरली होती. त्याचप्रमाणे बदनामी होईल असं वाटत असल्यामुळे तिने पोलीस स्थानकांत तीन दिवस तक्रार नोंदवली नाही, असं संबंधित तरुणीने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. नातेवाइकांच्या संमतीनंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. एसपी अभय सिंह यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.