शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

संतापजनक! मजुरीसाठी आलेल्या महिलेचे लैंगिक शोषण करून विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 19:47 IST

दोन वेळा विक्री करून झाल्यानंतर तिसऱ्यांदा विक्री करण्याचा आरोपींचा डाव फसला.

गोंदिया - पोट भरण्यासाठी पैसे कमविण्याच्या उद्देशाने चार-पाच महिन्यांपूर्वी गोंदिया येथे आलेल्या एका २७ वर्षाच्या महिलेचे चार  महिन्यापासून लैंगिक शोषण करुन तिची विक्री करण्यात आली. दोन वेळा विक्री करून झाल्यानंतर तिसऱ्यांदा विक्री करण्याचा आरोपींचा डाव फसला. परिणामी या प्रकरणात रामनगर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या चान्ना-बाक्टी येथील २७ वर्षांची महिला चार ते पाच महिन्यापुर्वी गोंदिया येथे मजुरीचे काम करण्यासाठी आली होती. रामनगर येथील ओमप्रकाश नावाच्या इसमाने तिला स्वत:च्या घरी कामावर ठेऊन त्याने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. काही दिवस तिचे लैंगिक शोषण करुन आरोपी ओमप्रकाशने त्याच्या ओळखीच्या असलेल्या रामनगर येथील तिघांना भेटवून दिले.रामनगरातील आरोपी लाखन, किरण व लगडा या तिघांशी ओळख झाल्यावर त्यांनी मध्यप्रदेशाच्या राघोगड येथील सुनिता उदमसिंग मिना, उदमसिंग गप्पूलाल मिना व बुढढीबाई हरिचरण सैनी यांना ८० हजार रुपयात त्या महिलेला विक्री केले. त्या आरोपींनी विकत घेतल्यानंतर तिला पुन्हा संदीप हरिचरण सैनी व हरिचरण नाथूलाल सैनी रा.राघोगड यांना पैसे घेऊन विकले. त्यानंतर आरोपी संदीप सैनी याने त्या महिलेला काही दिवस पत्नी म्हणून ठेवून तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर त्याने तिला पुन्हा सुनिता उदमसिंह मिना या महिलेकडे दिले. तिने पुन्हा दोन मुलांशी सौदा करुन तिला विक्री करण्याचा प्रयत्न केला असतांना तो प्रयत्न फसला. याची भनक त्या पीडितेला लागताच तिने संधी साधून पळ काढला.चाचोडा पोलीस ठाणे गाठून तिने पोलिसांना आपबिती सांगितली. परिणामी या संदर्भात पिडीत महिलेची तक्रार रामनगर पोलिसात दाखल करण्यात आली. १५ डिसेंबरच्या रात्री सदर ८ आरोपींवर भादंविच्या कलम ३६३,३६६,३७० (अ), ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरी देण्याच्या नावावर लैंगिक शोषणकामाच्या शोधात आलेल्या महिलेला नोकरी देण्याचे आमिष देऊन तिचे लैंगीक शोषण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला नोकरीच्या शोधात आल्यास त्यांना नोकरीचे आमिष देऊन त्यांना देहव्यवसायात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. ती पीडित महिला पाच महिन्यानंतर घरी पोहचली. परंतु तिच्या सारख्या किती महिलांवर अत्याचार झालेत किती महिला बेपत्ता आहेत याचा नेम नाही. देहव्यवसायात ओढणारी टोळी सक्रीय?महिलांच्या लाचारीचा फायदा घेत त्यांना देह व्यवसायात ओढण्याचा प्रयत्न केला जातो.महिलांना देहव्यवसायात ओढून त्यांच्या सौंदर्याचा फायदा घेत त्यांची विक्री हरियाणा, मध्यप्रदेश येथे केली जाते. हा देहव्यवसाय करणाऱ्या टोळीवर पोलीस लगाम लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण