आर्थर रोड जेलमध्ये कैद्यावर लैंगिक अत्याचार. दोन कैद्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 07:04 AM2023-06-13T07:04:03+5:302023-06-13T07:04:20+5:30

समीर शेख उर्फ पुडी (२३) व राशीद फराज (३६) अशी आरोपींची नावे आहेत

Sexual assault on prisoner in Arthur Road Jail. Action against two prisoners | आर्थर रोड जेलमध्ये कैद्यावर लैंगिक अत्याचार. दोन कैद्यांविरुद्ध कारवाई

आर्थर रोड जेलमध्ये कैद्यावर लैंगिक अत्याचार. दोन कैद्यांविरुद्ध कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आर्थर रोड कारागृहात एका कैद्यावर दोन कैद्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघड झाली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शेख उर्फ पुडी (२३) व राशीद फराज (३६) अशी आरोपींची नावे आहेत.

पुडी आणि फराज यांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. २३ वर्षीय कैद्याने केलेल्या तक्रारीनुसार ७ जून रोजी कारागृहाच्या बाथरूममध्ये पुडी आणि फराजने त्याला अडवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर, ९ तारखेला आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. पुडी या आरोपीने त्याला मारहाण केली. मारहाणीबाबत कारागृह अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तरुणाकडे धाव घेत चौकशी केली. भीतीने तरुण शांत होता, पण अखेर त्याने कारागृह कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. रविवारी त्याच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, शांतता भंग करणे, धमकावणे, मारहाण तसेच संगनमत करून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Sexual assault on prisoner in Arthur Road Jail. Action against two prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग