शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या बायकोच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे ; सावत्र बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 21:10 IST

Molestation : शेगाव शहरातील अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले.

ठळक मुद्देकोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे अल्पवयीन मुलगी घरीच राहत होती. त्यावेळी तिला सावत्र बाप वाईट नजर ठेवत असल्याचे लक्षात आले.

शेगाव : दुसऱ्या बायकोच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावत्र बापाला शेगाव शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

शेगाव शहरातील अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले. तेव्हापासून अल्पवयीन मुलगी आईसोबतच सावत्र बाप असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत यांच्या घरीच राहत होती. आई कामानिमित्त बाहेर जात असताना तसेच कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे अल्पवयीन मुलगी घरीच राहत होती. त्यावेळी तिला सावत्र बाप वाईट नजर ठेवत असल्याचे लक्षात आले.

रात्री झोपेत असताना आरोपी हा पीडितेच्या बाजूला येऊन झोपत होता. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. ही बाब पीडितेने आईला सांगितल्यावर तिला तिच्या आजीकडे पाठवून दिले. गुरुवारी पीडिता खासगी कामानिमित्त गांधी चौकातून जोगडी फैलकडे जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तसेच तत्काळ अटक करण्यात आली. अधिक तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगShegaonशेगावPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळArrestअटक