पार्श्वगायिकेच्या मुलीचे लैंगिक शोषण; चर्चच्या प्रिस्टसह चार जणांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:28 IST2021-04-14T20:27:15+5:302021-04-14T20:28:59+5:30
Sexual Harassment : विशेष म्हणजे पार्श्वगायिकेने ज्यांच्यवर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे, त्यांच्यामध्ये चर्चमधलय प्रिस्टचा देखील समाविष्ट आहे.

पार्श्वगायिकेच्या मुलीचे लैंगिक शोषण; चर्चच्या प्रिस्टसह चार जणांवर आरोप
मिलनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक सनसनाटी प्रकरण समोर आले आहे. हैदराबादमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिकेने आपल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याबद्दल किलपुक ऑल महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे पार्श्वगायिकेने ज्यांच्यवर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे, त्यांच्यामध्ये चर्चमधलय प्रिस्टचा देखील समाविष्ट आहे.
असा आरोप केला जात आहे की, 15 वर्षीय मुलगी आपल्या काकूकडे राहत होती. काकू, काका आणि नातेवाईकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीचे म्हणणे आहे की, किलपुक येथील अॅलाइव्ह चर्चचे प्रिस्ट हेन्री यांनी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे की, १५ वर्षाच्या मुलीवर गेल्या आठ वर्षांत अनेकदा लैंगिक अत्याचार केले गेले होते, कारण ती आपल्या काकूबरोबर चेन्नई येथे राहत होती. पोलिसांनी पॉक्सोच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.