शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:43 IST

Sextortion Exposed : सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे.

अलवर - राज्यातील अलवर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. अलवर जिल्ह्यातील शिवाजी पार्क पोलिस स्टेशनने सेक्सटॉर्शन आणि सायबर फसवणूक करणाऱ्या मेवात टोळीच्या १९ गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने १ कोटींहून अधिक फसवणुकीचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २६ मोबाईल जप्त केले आहेत. सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे.पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, भैंसडावत गावाकडून बंधेडीकडे जाणाऱ्या मोकळ्या जागेवर सुमारे २०-२५ जण बसले आहेत. माहिती देणाऱ्याने सांगितले होते की, हे लोक मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ चॅट करून लोकांना ब्लॅकमेल करून, वाहनाचे फोटो आणि लष्कराच्या जवानाचे फोटो लोकांना दाखवून OLX वर  ​​फसवणूक करतात. या माहितीवरून इंचार्ज चौकी नसवारीचे एएआय लाखनसिंग आणि रामपाल जप्ता यांच्या मदतीने घटनास्थळी अटक करण्यात आली.

स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलआरोपी मोबाईलमध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे  कमर्शियल अकाउंट आणि फोन-पे, गुगल-पे, पेटीएम आणि फेसबुकसारख्या इतर  अ‍ॅप्सवर वेगवेगळ्या नावाने खाते उघडले असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आरोपींनी पीडितेला व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंटवरून तरुणीचे न्यूड व्हिडिओ दाखवून भडकावले. त्यानंतर ते त्याच्या स्क्रीनच्या रेकॉर्डर  अ‍ॅपच्या मदतीने स्क्रीन रेकॉर्डिंग करत, त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करून पैशांची फसवणूक करत.जाहिरातींच्या नावाखाली फसवणूकOLX आणि इतर सोशल साईट्सवर ते वाहनांच्या विक्रीच्या जाहिराती देऊन लोकांची फसवणूक करत असल्याचेही समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटो दाखवून ते लष्कराचे शिपाई बनून पैसे उकळत. एसपी तेजस्वानी गौतम यांनी सांगितले की, मेवातमध्ये सेक्सटॉर्शन आणि सायबर फसवणूक करणाऱ्या १९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाcyber crimeसायबर क्राइमRajasthanराजस्थानPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक