धक्कादायक! सेक्स रॅकेटच्या तस्करानं 75 बांगलादेशी मुलींशी केलं लग्न; 200 जणींना बनवलं कॉलगर्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:06 PM2021-10-04T12:06:46+5:302021-10-04T12:07:25+5:30

बांगलादेशातील एजन्ट या मुलींना गुप्तपणे कोलकात्यात आणत. येथे त्यांना एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ठेवले जाई. येथे त्यांना बॉडी लँगवेज आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण दिले जात. ट्रेन झाल्यानंतर या मुलींना मुंबईला पाठवण्यात येई अन् मग...

Sex racket smuggler married 75 bangladeshi girls and made 200 girls callgirls prostitute Indore Madhya Pradesh  | धक्कादायक! सेक्स रॅकेटच्या तस्करानं 75 बांगलादेशी मुलींशी केलं लग्न; 200 जणींना बनवलं कॉलगर्ल

धक्कादायक! सेक्स रॅकेटच्या तस्करानं 75 बांगलादेशी मुलींशी केलं लग्न; 200 जणींना बनवलं कॉलगर्ल

googlenewsNext

इंदूर - मध्यप्रदेशातील इंदूर पोलिसांनी अटक केलेल्या, बांगलादेशी तरुणींची तस्करी करणाऱ्या मुनीर उर्फ ​​मुनीरुलने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीने बांगलादेशातून 200 हून अधिक बांगलादेशी तरुणींना आणून त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले होते. तो दरमहिन्याला 55 हून अधिक मुलींना आणत होता. गेल्या 5 वर्षांपासून तो या व्यवसायात आहे. आरोपीने आतापर्यंत 75 मुलींशी लग्न केले आहे. इंदूर एसआयटीने मुनीरला गुरुवारी सुरत येथून अटक केली होती. (Sex racket smuggler married 75 bangladeshi girls and made 200 girls callgirls prostitute Indore Madhya Pradesh)

आरोपी या मुलींना नाल्याच्या मार्गाने बांगलादेश आणि भारताच्या पोरस सीमेवर आणत आणि सीमेजवळील छोट्या गावांतील एजन्ट्सच्या माध्यमाने त्यांना मुर्शिदाबाद आणि आसपासच्या ग्रामीण भागात आणून भारतात प्रवेश करत होते.
 
इंदूर पोलिसांनी 11 महिन्यांपूर्वी लसुडिया आणि विजय नगर भगांत ऑपरेशन चलवून 21 बांगलादेशी मुलींना सोडवले होते. यांत 11 बांगलादेशी तरुणींचा तर इतर काही तरुणींचा समावेश होता. याप्रकरणी सागर उर्फ सँडो, आफरीन, आमरीन आणि इतर काहींना आरोपी बनवले होते. तर मुनीर पळून गेला होता. त्याला गुरुवारी सूरत येथे अटक करून इंदूरला आणण्यात आले आहे.

इंदूर पोलिसांनी मुनीरवर 10 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तो बांगलादेशमधील जसोर येथील रहिवासी आहे. त्याने अधिकांश मुलींसोबत लग्न केले आहे आणि नंतर भारतात आणून त्यांची विक्री केली. त्याच्या मागे एक मोठे नेटवर्क आहे. सेक्स रॅकेटशी संबंधित टोळी सर्वप्रथम या मुलींना कोलकाता, नंतर मुंबईत प्रशिक्षण देते. यानंतर, मागणीनुसार त्यांना देशातील इतर शहरांमध्ये, जसे भोपाळ आणि इतर शहरांमध्ये पुरविले जाते, अशी माहिती मुनीरकडून मिळाली आहे. 

कोलकाता आणि मुंबईत दिलं जायचं ट्रेनिंग -
बांगलादेशी मुलींना इथपर्यंत आणण्यामागची जी कहाणी समोर आली आहे, त्यानुसार, बांगलादेशातील एजन्ट गरीब कुटुंबांतील मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सीमा ओलांडून गुप्तपणे कोलकात्यात आणायचे. येथे त्यांना एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ठेवले जात. येथे त्यांना बॉडी लँगवेज आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण दिले जात. ट्रेन झाल्यानंतर या मुलींना मुंबईला पाठवण्यात येई. येथे पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जात. यानंतर, देशातील वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या मागणीनुसार त्यांना त्या शहरांमध्ये पाठविले जात. या मुलींना सूरत, इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, पुणे, मुंबई, बेंगळुरूमध्येही पाठविण्यात येत होते.

Web Title: Sex racket smuggler married 75 bangladeshi girls and made 200 girls callgirls prostitute Indore Madhya Pradesh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.