सेक्स रॅकेटचा भांडाफोड; महिला दलाल गजाआड, तीन मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:20 IST2022-02-09T18:20:31+5:302022-02-09T18:20:53+5:30
Sex Racket : कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडंसी हॉटेल जवळ मंगळवारी सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

सेक्स रॅकेटचा भांडाफोड; महिला दलाल गजाआड, तीन मुलींची सुटका
कल्याण: ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांकडूनकल्याण आणि उल्हासनगर परिसरात चालणा-या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. याप्रकरणी सेक्स रॅकटे चालविणा-या दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडंसी हॉटेल जवळ मंगळवारी सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना एक महिला दलाल मुलींकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असून कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडंसी नजीक काही मुलींना घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून या दलाल महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या ताब्यातून तीन मुलींची सुटका केली. याप्रकरणी स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला दलालाला अटक करून तीन मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.