Sex Racket In Mumbai: मुंबईत घरात गुप्त खोल्या, २६ तरुणींना बाहेर काढले; मोठे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 08:01 IST2022-12-22T08:01:19+5:302022-12-22T08:01:43+5:30
मुंबईतील एका घराच्या गुप्त खोल्यांमध्ये या तरुणींना ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांना अटक केली आहे.

Sex Racket In Mumbai: मुंबईत घरात गुप्त खोल्या, २६ तरुणींना बाहेर काढले; मोठे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
मुंबई पोलिसांनी मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दक्षिण मुंबईतील एका घरामध्ये खास भूमिगत खोली बनविण्यात आली होती. त्यातून २६ तरुणींना बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांना अटक केली आहे.
मुंबईतील एका घराच्या गुप्त खोल्यांमध्ये या तरुणींना ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की मुंबई पोलिसांची समाज सेवा शाखेने टीप मिळाल्यानुसार मंगळवारी लेमिंग्टन रोडवरील एका इमारतीमध्ये बनावट ग्राहक पाठविला. यानंतर खबर मिळताच पोलिसांनी तिथे छापा मारला. जे चार जण ताब्यात घेण्यात आले आहेत, ते हे सेक्स रॅकेट चालवित असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतू छापेमारीदरम्यान त्यांचे १० साथीदार पळून गेले.
देहव्यापारातील या तरुणी वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. त्यांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात आले होते. एसएसबीने अटक केलेल्या पुरुष व महिला आणि सुटका केलेल्या तरुणींना पुढील तपासासाठी डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.