हडपसरला दोघांकडून ७ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:15 IST2019-08-31T16:14:20+5:302019-08-31T16:15:59+5:30
हडपसर येथील ट्रँगल ब्रीजजवळ एका मोटारसायकलवर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले.

हडपसरला दोघांकडून ७ किलो गांजा जप्त
पुणे : हडपसर येथे मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख रुपयांचा ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला.संदीप भागवत वाघ (रा़ उपळाई ठोगे, ता़. बार्शी, जि. सोलापूर) आणि अभिजित भगवान थिटे (रा़. वैभव टॉकीजसमोर गरड बिल्डिंग, हडपसर,मूळ बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना हडपसर येथील ट्रँगल ब्रीजजवळ एका मोटारसायकलवर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यावर त्यात ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यांच्याकडून गांजा, १२०० रुपये व मोटारसायकल असा २ लाख २ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.