नागपाड्यात गुटख्याच्या सात गोदामांना टाळे, सहा आरोपींना अटक; एक पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 03:33 PM2023-05-15T15:33:46+5:302023-05-15T15:34:24+5:30

याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सात गोदामांना टाळे ठोकण्यात आले असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली, तर एका पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

Seven Gutkha godowns busted in Nagpada, six accused arrested; a spread | नागपाड्यात गुटख्याच्या सात गोदामांना टाळे, सहा आरोपींना अटक; एक पसार

नागपाड्यात गुटख्याच्या सात गोदामांना टाळे, सहा आरोपींना अटक; एक पसार

googlenewsNext

मुंबई : दक्षिण प्रादेशिक विभागात मोडणाऱ्या सर जे.जे. मार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोग्यात घातक असणाऱ्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री आणि साठा करण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सात गुदामांना टाळे ठोकण्यात आले असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली, तर एका पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हाजी कासम चाळ, नागपाडा येथील ५ ठिकाणी, तर वसीम खान रोड येथे २ ठिकाणी पोलिस पथकांनी छापे टाकले. त्या ठिकाणावरून २३ लाख २३ हजार २०८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. इतकेच नव्हे तर गुटख्याची विक्री करून मिळविलेली २ लाख ४ हजार ७५० रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावत प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूचा साठा केलेल्या सात गुदामांना सील करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींची नावे इरफान उर्फ मजनू अहमद, मोहरम अली उर्फ गुड्डू, रियाज करीम, मोहम्मद हुसेन रमजान, मो. अब्रार खान, अफजल खान अशी असून, पसार सलमान खान याचा शोध सुरू आहे.
 

Web Title: Seven Gutkha godowns busted in Nagpada, six accused arrested; a spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.