शीर धडापासून वेगळं केलेला मृतदेह सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 22:06 IST2018-11-19T22:04:56+5:302018-11-19T22:06:03+5:30
घटनास्थळी सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखल्यावरून त्याची ओळख पटली. त्याचा भाऊ मानखुर्द येथे राहणारा असून त्याला संपर्क केल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले.
_201707279.jpg)
शीर धडापासून वेगळं केलेला मृतदेह सापडल्याने खळबळ
नालासोपारा - नालासोपारा येथील मोरागावाच्या जंगलात १९ वर्षाय तरूणाचा शीर आणि धर वेगळे केलेला मृतदेह आढळून आला. विकास बावधने असे या तरूणाचे नाव असून तो सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहणारा आहे. आज संध्याकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. नालासोपारा पूर्वेच्या मोरेगावच्या खदाण रोड येथील जंगलात हा मृतदेह आढळून आला. चॉपरने त्याची हत्या करण्यात आली होती. या तरुणाचे शीर एका बॅगेत भरले होते तर जवळच त्याचे धड पडलेले होते. घटनास्थळी सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखल्यावरून त्याची ओळख पटली. त्याचा भाऊ मानखुर्द येथे राहणारा असून त्याला संपर्क केल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.