खळबळजनक! दगडाने ठेचलेला चेहरा अन् हात बांधलेल्या स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 17:35 IST2020-03-18T17:30:45+5:302020-03-18T17:35:23+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.

खळबळजनक! दगडाने ठेचलेला चेहरा अन् हात बांधलेल्या स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह
हैदराबाद - देशात खळबळ माजविणाऱ्या दिशा बलात्कार प्रकरणानंतर तेलंगणामध्ये आणखी एका महिलेचा विचित्र परिस्थिती मृतदेह सापडला आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे पोलिसांनी मंगळवारी एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.
पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा चेहरा दगडांनी ठेचलेला आणि हात बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. अशा परिस्थितीत हल्लेखोरांनी त्या महिलेला दुसर्या ठिकाणी ठार मारले आणि मृतदेह या परिसरात फेकला असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या बाहेरील चेवल्ला परिसरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. हत्येपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता हे स्पष्ट अद्याप झाले नाही.
शवविच्छेदन अहवालात उलगडणार रहस्य
पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच महिलेवर बलात्कार झाला होता की नाही हे स्पष्ट होईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंगावरील दागिने आहेत तसेच आहेत. या महिलेची इतरत्र ठिकाणी हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला
धक्कादायक! पित्याने दोन मुलांना फासावर लटकवले; नंतर स्वत:ही गळफास घेतला
सीसीटीव्ही फुटेजचा तपास
अद्याप महिलेची ओळख पटली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर हैदराबादमधील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात येथील रिसॉर्टमध्ये काम करणार्या महिलेची माहिती मिळाली आहे. त्याचवेळी आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी चेवल्लाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.