खळबळजनक! राहत्या घरात वृद्धाची गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 18:55 IST2020-04-14T18:52:55+5:302020-04-14T18:55:53+5:30
अनेक दिवस दारू न मिळाल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खळबळजनक! राहत्या घरात वृद्धाची गळफास घेत आत्महत्या
नवी मुंबई - घणसोली गावात वृद्धाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती एकटीच त्याठिकाणी राहत होती. त्यांना दारूचे व्यसन असल्याने अनेक दिवस दारू न मिळाल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घणसोली गावातील कोळीवाडा परिसरात हि घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या शिवराम वैती (५५) यांचा राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ते अविवाहित असून मासेमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करायचे. शिवाय त्यांना दारूचे देखील व्यसन होते. मंगळवारी त्यांच्या घराशेजारीच राहणारा त्यांचा पुतण्या त्यांना यावेळी घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थतेत शिवराम यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी लॉकडाऊन मुळे अनेक दिवस दारू न मिळाल्याच्या नैराश्यात त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांच्या आत्महत्येची नोंद रबाळे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक विश्वास चव्हाण याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.