खळबळजनक! पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 08:18 PM2019-10-01T20:18:07+5:302019-10-01T20:24:12+5:30

त्याने आत्महत्येसारखे शेवटचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत.

Sensational! Suicide attempt at police station premises | खळबळजनक! पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक! पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना घडली.रिजवान अब्दूल हमीद जमादार हा बैंगणवाडी येथे राहणार आहे.प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात व्यक्तीने पेटवून घेतले आहे. गोवंडी, बैंगणवाडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात आज दुपारी ही घटना घडली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात खळबळ माजली होती. रिजवान अब्दुल स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना घडली. हमिद जमादार (४४) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे नाव असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. रिजवान अब्दूल हमीद जमादार हा बैंगणवाडी येथे राहणार आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याने आत्महत्येसारखे शेवटचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Sensational! Suicide attempt at police station premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.