खळबळजनक! मुलुंड येथे रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:28 IST2019-08-12T13:25:44+5:302019-08-12T13:28:47+5:30
जखमी राजेश भंडारी यांच्यावर वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खळबळजनक! मुलुंड येथे रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू
मुंबई - मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलुंड पश्चिमेकडील येथील एन. एस. रोडवर रात्री एक भले मोठे झाड कोसळले. या झाडाखाली एक रिक्षा आल्याने त्या रिक्षावर झाड कोसळले. यात रिक्षाचालक अशोक शिंगरे (४५) आणि प्रवासी राजेश भंडारी (२९) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असता रिक्षाचालक अशोक शिंगरे याला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले . या झाडाची छाटणी केली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांनी या झाडाची छाटणी झाली नसल्याने ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप केला आहे. जखमी राजेश भंडारी यांच्यावर वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई - मुलुंड येथे रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यूhttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2019