Sensational! Panic situation in Nalasopara; Gangrape on a minor girl who went for a morning walk | खळबळजनक! नालासोपाऱ्यात गर्दुल्यांची दहशत; मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप

खळबळजनक! नालासोपाऱ्यात गर्दुल्यांची दहशत; मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप

ठळक मुद्देपीडित तरुणीच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारपैकी दोन आरोपींना पकडण्यात यशस्वी झाले आहे. पोलिसांनी तपास करत आरोपी कैलाश आणि रोहित याला अटक केले असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.

नालासोपारा - पूर्वेकडील परिसरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या मित्रमैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेली असता चार गर्दुल्ले आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करून पीडित तरुणीला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने रिक्षात बसवून नेऊन एका सुरू असलेल्या इमारतीच्या सदनिकेत नेऊन तिच्यावर गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारपैकी दोन आरोपींना पकडण्यात यशस्वी झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नालासोपारा शहरात गर्दुल्यांची दहशत असल्याचे उघड झाले असून महिला व तरुणीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या 5 मित्र मैत्रिणीसोबत शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आचोळे तलाव येथे मॉर्निंग वॉक करत असताना नवनीत हॉस्पिटलच्यासमोर आरोपी गर्दुल्ले अमित बटला, कैलाश संतोष वीर, रोहित उर्फ मेंटल जयभगवान तनजोटकर आणि रोहन उर्फ टायगर संजय जगदाळे हे समोर येऊन मुख्य आरोपी अमित याने पीडित तरुणीला माझ्याबरोबर चल अन्यथा उचलून घेऊन जाईन असे बोलून तिच्या मित्र-मैत्रिणींना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करून तिला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तिला रिक्षात बसवून नंतर वैतीवाडी परिसरातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या एका सदनिकेमध्ये नेऊन आळी-पाळीने गँगरेप केला आहे. पीडित तरुणीने घडलेली सर्व हकीकत तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन रविवारी संध्याकाळी तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करत आरोपी कैलाश आणि रोहित याला अटक केले असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: Sensational! Panic situation in Nalasopara; Gangrape on a minor girl who went for a morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.