खळबळजनक! अकोट शहरात भरदिवसा तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 16:25 IST2019-10-27T16:20:15+5:302019-10-27T16:25:32+5:30
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! अकोट शहरात भरदिवसा तरुणाची हत्या
ठळक मुद्देनरसिंग शाळेतील कर्मचारी नरेंद्र मोरे यांचा मुलगा रोहित मोरे (दादु) या युवकाचा आरोपीने भाला मारून केली हत्या शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अकोट - अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात दिवाळीच्या दिवशी एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक खानापूर वेश या भागात शुल्लक कारणावरून वाद सोडवत असताना नरसिंग शाळेतील कर्मचारी नरेंद्र मोरे यांचा मुलगा रोहित मोरे (दादु) या युवकाचा आरोपीने भाला मारून हत्या केल्याची प्राथमिक माहीती पोलीसांनी दिली. अकोट शहर पोलीसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.