खळबळजनक! मोबाईलच्या वेडापायी मुलाने केली आईची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 18:45 IST2019-10-08T18:44:12+5:302019-10-08T18:45:27+5:30
भोपाळ - मध्य प्रदेशातील राजगढ येथे एका जन्मदात्या मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोबाईलच्या वेडापायी ही ...

खळबळजनक! मोबाईलच्या वेडापायी मुलाने केली आईची हत्या
भोपाळ - मध्य प्रदेशातील राजगढ येथे एका जन्मदात्या मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोबाईलच्या वेडापायी ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मुलगा आईकडे अनेक दिवस आपल्या मोठ्या भावाकडे जसा मोबाइल फोन आहे तसाच फोन आपल्यालाही पाहिजे असल्याचा हट्ट करत होता. मात्र, अनेक दिवस हट्ट करुनही आईकडून मोबाइल मिळत नसल्याने मुलाने थेट चाकूने आपल्या आईची गळा चिरून हत्या केली. ज्या दिवशी ही हत्या झाली त्या दिवशी आरोपी मुलाचा मोठा भाऊ हा आपला मोबाइल घरीच विसरुन गेला होता. त्यामुळे तो मोबाइल पाहून छोट्या भावाने हट्ट सुरु केला होता. त्याला देखील असाच फोन हवा आहे.
अल्पवयीन मुलाने आईचा गळा चिरला. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात आईला टाकून मुलाने मोबाईल घेऊन पळ काढला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोचले आणि त्यांनी जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. हत्या करणाऱ्या मुलाचा पोलीस शोध घेत असून त्याला एका बस स्टॉपवर पोलिसांनी पहिले. मात्र, ताब्यात घेण्याआधीच त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला.