खळबळजनक! पनवेल येथे हॉटेलात केरळातील दाम्पत्याने चिमुकलीसह केले विषप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 17:31 IST2019-11-09T17:29:30+5:302019-11-09T17:31:24+5:30
याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खळबळजनक! पनवेल येथे हॉटेलात केरळातील दाम्पत्याने चिमुकलीसह केले विषप्राशन
पनवेल- पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरातील समीर हॉटेलमध्ये केरळहून आलेल्या दाम्पत्याने २ वर्षीय चिमुकलीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. केरळहून आलेल्या आई - वडिलांनी २ वर्षाच्या मुलीसह विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
समीर हॉटेलमध्ये चेक आउटच्या दुपारी १२ वाजताच्या वेळेनुसार हॉटेलमधील कर्मचारी रूम पाहण्यास गेला. त्यावेळी, राहत असलेल्या रूमचा दरवाजा ठोठावला तरी आतून काही आवाज येत नसल्याने त्याने रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दाम्पत्याने २ वर्षीय चिमुकलीसह विषप्राशन केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ २ वर्षीय मुलीसह तिच्या आई - वडिलांना पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी उपचाराआधीच २ वर्षीय चिमुकली दगावली होती. तर तिच्या आई - वडिलांवर उपचार सुरु आहेत.
पनवेल- शहरातील समीर हॉटलमध्ये आई वडिलांनी २ वर्षाच्या मुलीसह विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) November 9, 2019