शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मांजरा नदीपात्रात सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 21:58 IST

धनेगाव-उमरगा परिसरातील नदीपात्रात तरंगत होती सुटकेस

ठळक मुद्दे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी प्रेत ताब्यात घेतले आहे़ सुटकेसमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाच्या तरुणीचे प्रेत आढळले.

लातूरलातूरपासून जवळ असलेल्या धनेगाव-उमरगा येथील मांजरा नदीपात्रातील पाण्यात मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका भल्यामोठ्या सुटकेसमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणीचे प्रेत तरंगत असल्याचे आढळले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी प्रेत ताब्यात घेतले आहे़. कोणीतरी खून करून प्रेत सुटकेसमध्ये कोंबून पाण्यात टाकले असावे, असा अंदाज वर्तवून लातूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.पोलिसांनी सांगितले, धनेगाव ते उमरगा जाणाऱ्या रस्त्यालगत पाण्यामध्ये सुटकेस तरंगत असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कळविली़ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सुटकेसमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाच्या तरुणीचे प्रेत आढळले. प्रेत पाण्याने फुगले आहे. त्यामुळे ओळख पटणे अवघड झाले आहे़ दोन दिवसांपूर्वी सदर प्रेत पाण्यात टाकले असावे, अशी शक्यता आहे़ काळ्या रंगाचे एक चारचाकी वाहन या परिसरातून दोन दिवसांपूर्वी गेले होते़ त्या वाहनातूनच सुटकेस टाकली असेल़ शिवाय, त्यानंतरही एक पांढºया रंगाची कार तेथे थांबली होती, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे़ ग्रामस्थांच्या या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे़ दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, पोकॉ़ गुडे पाटील यांच्या तक्रारीवरून ३०२, २०१ भादंविप्रमाणे लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांकडून तपास सुरू : पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र मानेमृतदेह पाण्याने फुगला आहे़ त्यामुळे ओळख पटणे अवघड झाले आहे़ दरम्यान, शेजारच्या पोलीस ठाण्यांमध्ये तसेच शेजारील जिल्ह्यात व राज्यात या दोन-तीन दिवसात मिसिंगची घटना घडली आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे़ मिसिंगच्या घटना कळल्यानंतर ओळख पटणे सोयीचे होईल. त्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरPoliceपोलिसriverनदी