शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 14:57 IST

१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल १ लाख, ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे मेट्रो रेल कार्पोरेशनचे नागपुरात सिव्हील लाईनमध्ये ' मेट्रो हाऊस' आहे. येथील कार्यालयात अत्याधुनिक उपकरणे आणि टेलिफोन यंत्रणा बसविण्यात आली आहे. पोलिसांनी फसवणुकीचे कलम ४२० तसेच सहकलम ६५, ६६ (ड) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नागपूर : महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून त्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केले. १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल १ लाख, ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्प व्यवस्थापकांनी या प्रकरणाची गुरुवारी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

मेट्रो रेल कार्पोरेशनचे नागपुरात सिव्हील लाईनमध्ये ' मेट्रो हाऊस' आहे. येथील कार्यालयात अत्याधुनिक उपकरणे आणि टेलिफोन यंत्रणा बसविण्यात आली आहे. ईपीडीएक्स इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात आरोपींनी देश-विदेशात भरमसाठ कॉल केले. त्यामुळे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला १ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत एक महिन्याचे फोनचे बिल ९ लाख, ८४ हजार, ५०० रुपये आले. अकाउंट भागात हे बिल जाताच एकच खळबळ उडाली. एका महिन्याचे इतके बिल कसे आले, यावर मंथन सुरू झाले. नंतर महा मेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अवघे मेट्रो रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ पातळीवर विचार विमर्श केल्यानंतर ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मनेजर (टेलिकॉम) आशिषकुमार त्रिभुवन संधी यांनी गुरुवारी सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचे कलम ४२० तसेच सहकलम ६५, ६६ (ड) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दहशतवादी कनेक्शन ? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेट्रो रेल्वेची ऑनलाइन हॅक करून विदेशात अनेक कॉल केले त्यामुळे संबंधित गुन्हेगारांचा पाकिस्तान अथवा अशाच कोणत्या शत्रू राष्ट्र किंवा त्या राष्ट्रातील दहशतवादी संघटनासोबत कनेक्शन आहे का, असा धडकी भरविनारा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधाने संबंधित अधिकारी चौकशी करीत आहेत.कुठे किती कॉल्स ? संबंधित आरोपींनी  पाकिस्तान, बांगलादेश किंवा कोणत्या देशात, किती कॉल केले, त्याची माहिती उघड होऊ शकली नाही. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी या संबंधाने बोलताना प्रकरण संवेदनशील असल्यामुळे कसून तपास सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूरPoliceपोलिसfraudधोकेबाजीrailwayरेल्वे