शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगाला कंटाळून वृद्धेने घेतले जाळून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 20:48 IST

टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला १०० टक्के भाजली होती

मुंबई - टिळक नगर येथील अमरदीप सोसायटीमध्ये आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास एका वयोवृद्ध महिलेने कर्करोगाला कंटाळून स्वतःला जाळून घेतले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला १०० टक्के भाजली होती असल्याचे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले. 

लीला बाळकृष्ण नायर (वय - ८३) या वृद्ध महिला गेल्या २५ वर्षांपासून स्तनाचा कर्करोगाने त्रस्त होती. नंतर गेली ४ ते ५ वर्षांपूर्वी तिला हाडांचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. कर्करोगाने त्रस्त झालेल्या लीला नेहमीच्या औषधोपचाराला कंटाळल्या होत्या. शेवटी आज टोकाचे पाऊल उचलत त्यांनी घरातील ढेकूण मारण्यासाठी ठेवलेले रॉकेल अंगावर ओतून घेत स्वतःला जाळून घेतले. दरम्यान, दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचा नातू घरी आला असता त्याने आजीला जळालेल्या अवस्थेत पाहून पोलिसांना कळविले. जाळून आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने घरातील वीजचे मुख्य स्विच बंद केले होते असल्याचे माहिती कांबळे यांनी दिली. नंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल केला. त्यावेळी डॉक्टरांनी ती १०० टक्के भाजली असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईfireआगPoliceपोलिस