सिगारेट ओढताना पाहिले, वर्गमित्रांनीच केली हत्या; डोक्यात दगड घातला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 05:56 IST2023-04-30T05:55:41+5:302023-04-30T05:56:17+5:30
शालेय गणवेश घातलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळल्याबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली हाेती.

सिगारेट ओढताना पाहिले, वर्गमित्रांनीच केली हत्या; डोक्यात दगड घातला अन्...
नवी दिल्ली - सिगारेट ओढत असल्याचे पाहिल्यामुळे वर्गमित्रांनीच एका १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी दिल्लीत घडली. हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला हाेता.
शालेय गणवेश घातलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळल्याबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली हाेती. जवळच त्याचे दप्तरही पडले हाेते. त्यावरून त्याची ओळख पटविण्यात आली. या मुलाचे नाव साैरभ असून, ताे इयत्ता आठवीचा विद्यार्थी हाेता. त्याने दाेन वर्गमित्रांना शाळेत सिगारेट ओढताना पाहिले हाेते. याबाबत ताे तक्रार करेल या भीतीने त्यांनी साैरभला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर दगडानेही त्याच्या डाेक्यावर वार केले हाेते.
वर्ग बदलल्यानंतर हाेता नाखूश
शाळेत नुकताच त्याचा वर्ग बदलण्यात आला हाेता. मात्र, नव्या वर्गात ताे आनंदी नव्हता. जुन्या वर्गातच ट्रान्सफर करण्याबाबत ताे आईला बाेलला हाेता. मात्र, शिक्षकांनी त्यास नकार दिल्याचे साैरभच्या आईने सांगितले.