भंडारा : आधुनिक काळात विमान आणि हेलिकॉप्टरची नवलाई संपली असली तरी आजही गाव खेड्यातून एखादे विमान अथवा हेलिकॉप्टर गेले की अनेकांना पाहण्याचा मोह आवरत नाही. असेच गावावरून जाणारे हेलिकॉप्टर पाहताना डोक्याच्या भारावर आदळून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पवनी तालुक्यातील खातखेडा येथे मंगळवारी घडली.लोमेश हिरामण पदेले (२४) रा. खातखेडा असे मृताचे नाव आहे. मंगळवारी तो घराशेजारी शेतामध्ये धानाच्या पऱ्ह्याला पाणी देत होता. त्यावेळी एक हेलिकॉप्टर आकाशातून जात होते. उत्स्तुकतेपोटी त्याने काम थांबवून मान वर करून हेलिकॉप्टर पाहत होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि पाठिमागे जावून डोक्याच्या भारावर आदळला. डोक्याला मार लागून तो बेशुद्ध झाला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात पवनी येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी लोमेशच्या घराकडे धाव घेतली. आकाशातून जाणारे हेलिकॉप्टर पाहने जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आकाशात उडणारं हेलिकॉप्टर पाहणे जीवावर बेतले; अचानक तोल गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 16:15 IST
Death : मान वर करून पाहताना डोक्यावर कोसळून मृत्यू
आकाशात उडणारं हेलिकॉप्टर पाहणे जीवावर बेतले; अचानक तोल गेला अन्...
ठळक मुद्देलोमेश हिरामण पदेले (२४) रा. खातखेडा असे मृताचे नाव आहे.आकाशातून जाणारे हेलिकॉप्टर पाहने जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.